देवघाट ते लिंग्याघाट

दसऱ्यानिमित्त अचानक ठरलेली आडवाटेवरील दोन घाटवाटांची भटकंती…

दरवर्षी प्रमाणे दसऱ्याची सुट्टी आहे म्हणून एखादा मोठा ट्रेक करू असे वृषभसोबत फोन वर बोलणं झालं  पण जायच कुठे हे आजून माहिती नव्हते?

दसऱ्याच्या आधीच्या रात्री वृषभचा फोन आला आणि म्हणाला, “उद्या धामणओहोळ गावापासून एक घाटवाट आहे आपण ती करूयात म्हणून”. तसं पाहायला गेल तर माझ्या माहितीप्रमाणे त्या गावाच्या चारही बाजूला कमीत कमी दहाहुन अधिक घाटवाटा आहेत ज्या कि खाली कोकणात आणि वरती पुण्याला येण्याजाण्यासाठी वापरतात. त्यापेकी दोन घाटवाटा म्हणजेच “देवघाट आणि निसनीची वाट” करायचं ठरवलं. अलिकडच्या काळामध्ये अनेक वाटा वापरण्यात येत नसल्यामुळे अदृश्य झाल्या आहेत.

सकाळी कामाचा लोड आणि दसरा असल्यामुळे गाडीची पूजा करून घरून निघायला जवळपास आठ वाजले होते. वृषभ त्याच्या पिकअप पॉईंट वर येऊन थांबला होता. त्याला घेऊन आम्ही लगेच ताम्हिणी घाटाच्या रस्त्याला लागलो. नाष्टा करून आम्ही पुढे खरवडेच्या म्हसोबाला नमन करत टेमघर धरणाजवळ पोहचलो. धरणाजवळ Quick snap काढून आम्ही लवासा सिटीमार्गे धामणओहोळ गावामध्ये पोहचलो. शहरामध्ये काम करत असणारे सगळे लोक सणामुळे गावाला परत आले होते. मला आपल्या लोकांमध्ये आल्यासारखं वाटत होतं. दसऱ्यामुळे कोणी वाटाड्या म्हणून आमच्यासोबत यायला तयार नव्हते पण खुप विनंतीनंतर लक्ष्मण शेडगे मामा तयार झाले त्याच वय कमीत कमी ६०-६५ वर्षे होत. त्यांनी नातवाला घरातून कोयता आणायला सांगितला आणि  काठी घेऊन आम्ही ट्रेक ला सुरुवात केली.

पावसाळा असल्यामुळे शेतामध्ये भाताची लागवड केली होती, हिरवगार निसर्गाचे फोटो टिपत, गावामधून दिसणारे डोंगरांची नावे आणि तिथून जाणाऱ्या घाटवाटांची माहिती घेत आम्ही पहिल्या ओढ्याजवळ पोहोचलो. त्या ओढ्याचं पाणी खाली लिंग्याघाट मध्ये असणाऱ्या धबधब्याला जात होते. मामा सांगत होते, ते ह्या वाटेने कमीत कमी दहा वर्षा पासून नव्हते गेले आणि गावामध्ये ही वाट फक्त त्यांना आणि गावातील राम शेडगे काका फक्त ह्या दोघांनाच माहिती आहे.

गप्पा मारत मारत आम्ही वाघजाईच्या खोंडाजवळ पोहचलो. वाघजाईचा ओढा पार करून दहा मिनटं चालल्यावर आम्ही देवघाटाच्या तोंडाला पोहोचलो. वाटेवर लोकांचा वावर नसल्यामुळे वाट झाडांमध्ये हरवली होती, मामांनी सोबत आणलेला कोयता बाहेर काढला आणि वाट बनवत आम्ही एका नाळेने खाली उतरलो. झाडी असल्यामुळे वाट बनवत चालायला लागत होत, नाळेतून थोड खाली आल्यावर उजव्या बाजूने वाट दिसली ती वाट पकडून आम्ही मोकळ्या रस्त्यावर लागलो. डाव्या बाजूला बघितला तर समोर लिंग्याघाट, निसनीची वाट ,बॉम्बे पॉईंट ,कुर्डुगड, खाली उंबार्डी आणि लिंग्याघाट मधले ढबढबे दिसत होते. पुन्हा एकदा डाट झाडीमध्ये शिरलो आता पुढे कारवीचे जंगल लागले. जवळपास ७ ते ८ फूट उंच कारवीमधून वाट बनवत आम्ही चालत होतो, उजव्या बाजूला वरती पाहिले तर तो दुर्गाडीचा किल्ला आहे असे मामा सांगत होते. उजवीकडे त्याचा कातळकड्याच्या बाजूने वाट खाली उतरून गवताच्या पठारावर येत होती, गवत तुडवत आम्ही एका नाळेच्या तोंडावर पोहोचलो आता इथून पुढची वाट नाळेतून होती. गर्द झाडी मुळे नाळ सुद्धा झाकली गेली होती. पूर्ण नाळ उतरताना कुर्डूगड तुमच्या नजरे समोर राहतो. पूर्ण नाळ उतरली तर तुम्ही उंबार्डी गावामध्ये जाता.

आम्ही पूर्ण नाळ न उतरता नाळेतूनच डावीकडे वाट जाते त्या वाटेने जायच ठरवल. त्या वाटेने पुढे आल्यावर वाटेमध्ये कोळीराजाच्या वाड्याचे अवशेष दिसतात. पहिल्या वाड्यापासून पुढे आल्यावर वाट ओढ्या जवळ येते. ओढा पार करुन आम्ही पुढच्या वाटेला लागलो. ही वाट कुर्डुगडाकडे जाते. ओढा पार करून पुढे आल्यावर राजाच्या वाड्याचे आणखी काही अवशेष आहेत जसे की चौकट, चौथरा, कोरीव दगड फोटो काढत काढत आम्ही पुढे मार्गस्थ झालो. पुढे आल्यावर वाट परत एका ओढ्या जवळ आलो. आता ह्या ओढ्यामधून डावीकडच्या बाजूने वरती जायच. ओढ्यामध्ये आम्हाला एक Natural Bath Tub दिसला मग काय एका बाजूला बॅग ठेऊन Tub मध्ये डुबकी मारायला सुरुवात केली दोन तीन Reels बनवले आणि आत्तापर्यंतच्या पायमोडीमुळे झालेल्या शिनवटा दूर केला.

जास्त वेळ न घालवता आम्ही लगेच पुढच्या वाटेला लागलो. आता पूर्ण वाट मात्र उभ्या चढायची होती. हश्या-हुश्या करत आम्ही धामणओहोळ कडून कुर्डुगडाकडे जाणाऱ्या वाटेला लागलो. थोड चालून पुढे आल्यावर वाट लिंग्याघाट आणि निसनीघाटच्या जंक्शन पॉईंट वर येऊन मिळते. तिथे काही काळासाठी विश्रांती करून आम्ही निसनीच्या वाटेने न जाता लिंग्याघाटाने जायचा निर्णय घेतला. ट्रेक ठरवलेल्या वेळेच्या आत संपत होता आणि मला क्रॅम्प्स यायला चालू झाले होते म्हणून आम्ही आमचा वेग कमी करण्याचे ठरवले पण काही क्षणात वातावरण पूर्णपणे धूकेने भरले आणि पावसाची सुरुवात झाली पावसामुळे अख्खा थकवा निघून गेला आणि आम्ही लगेच लिंग्याघाटाची चढाईस सुरवात केली पाण्याचा वेग वाढू लागला होता. पाण्यामधून घाट चढून आम्ही घाटाच्या तोंडावर पोहचलो घाटामधल्या धबधबा मुळे आमच मन हरपून गेल होत. लिंग्याघाटाच्या लिंगदेवला नमन करून आम्ही गावाच्या वाटेला लागलो. गावामध्ये पोहचलो सर्व गावकरी मंदिराजवळ पुजेसाठी जमले होते. पुजा संपल्यावर आम्ही पुण्याला यायला आमचा परतीचा प्रवास सुरु केला.

तर मंग असा होता आमच्या ह्या वर्षीच्या दसऱ्याचा दिवस धामणओहोळ मधल्या लोकांसोबतचा. माहिती कशी वाटली नक्की कळवा.

लेखक

ओंकार संतोष दळवी

Spread the love of Adventure Travel

Share this Article

1 Response

Leave a Reply

Latest Articles

Indian Arrowroot (चवर) at Raireshwar Plateau
19-Sep-2023
देवघाट ते लिंग्याघाट
15-Sep-2023
Kaas Pathar: Do’s & Don’ts
08-Sep-2023
।। सह्याद्री ।।
21-Nov-2022
दुर्गराज श्री राजगडाची इतिहासास ज्ञात नावे!
04-Nov-2022

Latest Comments

Mahendra Ghorpade
Good one Omkar…nicely explained 😍👍🏻
चंद्रशेखर दढेकर
श्री.विशाल काकडे यांचे, हा उत्कृष्ट लेख लिहिल्याबद्ल त्रिवार अभिनंदन व त्यांना त्रिवार धन्यवाद ! ट्रेकिंग...
Sachin Walunj
अप्रतिम सुंदर कविता! अगदी मनातलं सह्याद्रीच प्रतिबिंब कवितेत जागृत झाले आहे.🥰 जय भवानी जय शिवाजी...
Mahendra Ghorpade
Congratulations 🙂🤘🏻
Paresh
Congratulations to Vishal and team for the achievement ! #proudmoments
Contact Us
Hello, Welcome to SG-Trekkers!
Say Hi to us!WhatsApp
Mon-Fri, 08:00-20:00 hrs. (IST)Call us onPhone
Email UsEmail