तीन दिशांच्या तीन माच्या,मध्यभागी बेलाग बालेकिल्ला, ३ प्रमुख दरवाजे-६ चोरदिंड्या,नाळयुक्त दुहेरी चिलखती तटबंदी,दुहेरी-तिहेरी बांधणीचे बुरुज हे गडबांधणीतील अभिनव प्रयोग यांचे अवलोकन करता आपल्या लक्षात येते की शिवरायांनी दुर्गबांधणीचे “दुर्गविञान” हे एक नवेच शास्त्र निर्माण केले आहे.
समकालीन पाश्चात्यांनी लिहिले आहे –
“He(Shivaji Maharaj) studied with extreme care everything about the duty of general, soldier, above all the art of fortification which he understood better than ablest engineers.”
खरच गुंजण मावळातील हा डोंगर वयाच्या १२ वर्षी महराजांनी निरखला, हेरला आणि आपली बुद्धी कुंठीत होईल असे एक-एक प्रयोग करून जगातल्या एक सर्वोत्क्रृष्ट डोंगरी राजधानीमधे रुपांतर केले. दुर्गवास्तुशास्त्राचा हा सर्वोत्तम नमुना म्हणावा लागेल. अजुनही अनेक वास्तुंचे उत्खनन करुन त्यांना इतिहासाच्या कागदपत्रांची आणि भुगोलाच्या साक्षीची जोड दिली तर वास्तुंचे नवीन संदर्भ उजेडात येउ शकतात.
“हे शिवसुंदर मंदिर बघता। क्षणभर थांबे रवी मावळता ॥
दिग्गज आणति अभिषेकाला स्वर्गंगेचे घडे॥ उभे हे राजगडाचे कडे……”
[social-share align=”center” style=”icon” template=”9″ nospace=”yes” animation=”essb_icon_animation14″ counters=”1″ counter_pos=”insidehover” total_counter_pos=”leftbigicon” buttons=”love,whatsapp,facebook,twitter,gmail,copy”]