नमस्कार मित्रांनो, तुम्हाला आणि तुमच्या आप्तेष्टांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!
दिवाळीच्या शुभमुहूर्तावर आम्ही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन येत आहोत.
आपल्या SG-Trekkers संस्थेला ‘पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र (भारत सरकार)’ यांच्याकडून “अधिकृत साहसी पर्यटन उपक्रम (Authorised Adventure Tour Operator)” हा दर्जा प्राप्त झाला आहे.
मागच्या वर्षी २०२१ मध्ये महाराष्ट्र सरकार मार्फत जमीन/हवा/पाणी याठिकाणी करण्यात येत असलेल्या साहसी उपक्रमांबद्दल नियमावली जाहीर झाली होती. या नियमांचे पालन करून आणि त्यासाठी आवश्यक असलेली नोंदणी करून आपण साहसी उपक्रम आयोजित करू शकतो. तसेच, अशा उपक्रमांना सुरक्षा आणि मान्यताप्राप्त दर्जा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
जमीन/हवा/पाणी यापैकी कोणत्याही एक प्रकारचे साहसी उपक्रम आयोजित करणाऱ्या संस्थांना या नियमावली अंतर्गत तात्पुरत्या स्वरूपाच्या नोंदणीसाठी आव्हान करण्यात आले होते किंबहुना अनिवार्य करण्यात आले आहे.
आपल्या SG-Trekkers संस्थेमध्ये कोणतेही उपक्रम हे सरकारच्या नियमांचे उल्लंघन न करता पार पाडले जातात.
त्या अनुषंगाने अगदी तत्परतेने या धोरणांतर्गत आपल्या संस्थेची नोंदणी पूर्ण करून घेतली.
आज रविवार, २४ ऑक्टोबर २०२२, दिवाळी तसेच लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तावर आपल्याला “Authorised Adventure Tour Operator” चे प्रमाणपत्र मिळाले आहे.
नोंदणी क्रमांक: पु – २०२२ – ज – ११८ (साहसी पर्यटन धोरण २०२१, महाराष्ट्र)
[social-share align=”center” style=”icon” template=”9″ nospace=”yes” animation=”essb_icon_animation14″ counters=”1″ counter_pos=”insidehover” total_counter_pos=”leftbigicon” buttons=”love,whatsapp,facebook,twitter,gmail,copy”]
हार्दिक अभिनंदन, दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा
Congratulations…
हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐
Congratulations SG-TREKKERS team. Well deserved. All the best in your future endeavours.
Congratulations to Vishal and team for the achievement !
#proudmoments
Congratulations 🙂🤘🏻