हॅपी बर्थडे to SG-Trekkers – अमोल पोटे

आज ५ जानेवारी २०२०. SG-Trekkers – स्वच्छंद गिर्यारोहक – ५ वी Anniversary…!

मी खरंतर SG च्या ४ थ्या वर्षात त्यांच्यासोबत जोडला गेलो. पण म्हणतात ना की दोस्ती का कोई Age नही होता. तसंच काहीसं झालं माझ्यासोबत. अगदी नवीनवी. ताजीतवानी असली आमची दोस्ती तरी मी ट्रेकिंग शिकलो ते SG मध्येच. आधी नुसतंच उंडारत होतो म्हणा ना. अगदी Full Sleeves टी-शर्टच का घालायचा पासून ते पाणी, टोपी, टाॕर्च आणि चांगल्या ग्रीपचे बूट (महागडे नव्हे) आणि मजबूत सॕक सोबत असेल तरच ट्रेकला यायचं ह्या साध्या पण अगदी महत्वाच्या गोष्टी मी SG सोबत अनुभवत गेलो. रेडीमेड काही मिळणार नाही आणि स्वतःच्या गोष्टी स्वतःच करायच्या ही शिस्त पण तिथंच लागली. निसर्गाचा योग्य सन्मान केला तर तो तुम्हाला कुठेही अडचण येऊ देत नाही त्यामुळे SG मध्ये ट्रेकच्या सुरवातीलाच Introduction सोबत सह्याद्रीत पाळायची शिस्त याबद्दलही सांगितले जाते.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सर्वांना सोबत घेऊन ट्रेकची सुरूवात होते आणि सगळे ट्रेक पूर्ण करतील यासाठी जातीने लक्ष दिले जाते. ट्रेक हा ट्रेकच्या परिभाषेतच केला जातो. इथे मंदिरात, टेंटमध्ये किंवा आडोशाला झोपणे, गावातील सोयीनुसार न्याहारी करणे, वडाप ने प्रवास करणे, विहीरी किंवा नैसर्गिक स्त्रोतांमधील पाण्याचा वापर करणे, अनेकदा नाष्टा-जेवण आपणच बनविणे, झरा, धबधबा, नदीमध्ये मनसोक्त डुंबणे, अंगावरील ओले कपडे अंगावरच चालता चालता वाळवणे. हे आणि असे ट्रेकचा खराखूरा आनंद देणाऱ्या गोष्टींचा पूरेपूर समावेश असतो.

‘नो लाड…’ असे असले तरी तुमची फर्माईष पूर्ण केली जाते. एखाद्या ठिकाणी On Request भरपूर फोटोग्राफी साठी थांबता येते. एखाद्या नदीत मनसोक्त पोहता येते. राजूर सारख्या ठिकाणी गाडी पेढे खरेदीसाठी थांबवल्यावर सगळ्यांसाठी देखील पेढे SG कडून घेतले जातात. छोट्या छोट्या पण तितक्याच महत्त्वाच्या अशा सगळ्या गोष्टींची SG मध्ये काळजी घेतली जाते. एकंदरीतच काय तर SG-Trekkers सह्याद्रीसारखे आपले वाटते आणि आपलेच आहे ते.

ह्या आपलेपणाच्या ५ व्या वर्धापनदिनाच्या सह्याद्री शुभेच्छा..!

अमोल पोटे आणि विशाल काकडे
Written By

Amol Pote

Spread the love of Adventure Travel

Share this article

Leave a Reply

Contact Us
Hello, Welcome to SG-Trekkers!
Say Hi to us!WhatsApp
Mon-Fri, 08:00-20:00 hrs. (IST)Call us onPhone
Email UsEmail